शबनम न्यूज | प्रतिनिधी
दिनांक 4 ते 6 जुलै कालावधीत जत सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कॅनोईंग व कयाकींग व ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होऊन पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट्स च्या 30 खेळाडूंनी 77 सुवर्ण 29
रजत पदक प्राप्त केले. सदर राज्यस्तरीय स्पर्धेत ड्रॅगन बोट प्रकारात सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले व कॅनोइंग व कयाकींग प्रकारात उपविजेतेपद प्राप्त केले.
पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट्स च्या संघात स्वराज बारणे, रोहित भोसले ,शुभम गायकवाड,अभिलाष शिंदे, सोहेल नदाफ ,अमन शेख, यश वाघ, रोहन चव्हाण,साहिल नदाफ, सुयोग वाघ सुयोग भगुरे, आदित्य चव्हाण, विजय वाडे, अनिल कापडी, साहिल मोरे, सुमित धवन, अमोल खाडे, यश वाघ, शुभम शिंदे,शुभम गायकवाड,अभिलाष शिंदे, अमोल भगुरे, अभिनंदन बगाडे, किरण गुंडगीकर, अभिराज नागरे, मोहन मिसाळ ,अरुण नेसवानी,आदेश चौधरी, माऊली मार्कड, नटराज खेडेकर, रोहन चव्हाण, सौरभ ढोकले,सोमनाथ लगड, जयेश माळी, महेश गुट्टे खेळाडूंचा समावेश होता व (प्रशिक्षक निखिल बारणे, स्वामी महात्मे,)देवेंद्र सुर्वेयांनी संघाचे नेतृत्व केले.
पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट्स सेंटरचे अध्यक्ष सिद्धेश्वर बारणे, सचिव दत्तात्रय बारणे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.