शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुनावळे परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सदर रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी रहिवाशांच्या वतीने होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नवनाथ ढवळे यांनी सदर रस्ते दुरुस्त करावे अशी मागणी मनपा प्रशासनाकडे केली आहे.
शहरातील पुनावळे परिसरात आदित्य पॅराडाईज , ट्विन अर्क सोसायटी, अनामिका सोसायटी, श्रीहंस सोसायटी, सरिशा सोसायटी, श्रेया हौसींग सोसायटी, श्वास्वत ॲव्हेन्यु हौसींग सोसायटी या सोसायटीकडे जाणारा रस्ता हा पूर्णपणे खराब झाला असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. येथील रहिवाशांनी याबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. तरी सदर सोसायटींकडे जाणारा १८ मीटरचा रस्ता दुरुस्त करावा, या रस्त्यावर त्वरित डांबरीकरण करावे, अशी मागणी भाजपचे नवनाथ ढवळे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.
त्यांच्या या मागणीची दखल महापालिका कार्यकारी अभियंता शिंदे यांनी घेतली असून येत्या दहा दिवसात सदर रस्ता डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.