शबनम न्यूज | प्रतिनिधी
बिना इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी येथे पार पडलेल्या पिंपरी चिंचवड जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा 6 जुलै 2025 मध्ये एकूण 18 शाळांतील 274 खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत आदित्य इंटरनॅशनल स्कूल, डुडुळगाव, आळंदी येथील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावत आपल्या शाळेचे नावलौकिक केले.
थाई बॉक्सिंग हा खेळ शालेय क्रीडा स्पर्धेत समाविष्ट असून भारतीय महासंघाची मान्यता आहे व आंतरराष्ट्रीय दर्जेला हा खेळ खेळला जातो, अनेक खेळाडूंना या खेळातून फायदे होत आहेत.
जिल्हास्तर स्पर्धेचे उदघाटन उद्योजक अकमलखान सर यांच्या शुभ हस्ते पार पडले. बक्षीस वितरण सोहळ्यास बिना इंग्लिश स्कूलचे संस्थापक अझमखान सर, राष्ट्रीय थाय बॉक्सिंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पाशा आतार सर, तसेच वरिष्ठ पत्रकार सुनील साठे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विविध वजन गटातील आदित्य स्कूलचे विजयी खेळाडू पुढीलप्रमाणे
सुवर्णपदक विजेते-: ओमकार बनसुडे, रुद्राक्ष जाधव, स्वराली गाढवे
रौप्यपदक विजेते-: सई खामकर, श्रेया मोरे, शौर्य साळुंखे, आयुष हतागळे
कास्यपदक विजेते-: संग्राम चव्हाण, शौर्य वाबळे, मिहीर दाभाडे, देसाई जीवन, रुद्र गुबाळे, मृणाल रजपूत, दीप्ती पानसरे
या स्पर्धेमधील काही खेळाडूंची राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून, ही बाब शाळेसाठी अत्यंत गौरवाची आहे.
विजयी खेळाडूंना शाळेचे क्रीडा पर्यवेक्षक रविराज गाढवे सर व दीप्ती शेटे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संचालक मयूर ढमाले सर, राजीव पाटील सर आणि मुख्याध्यापिका शितल पाटील मॅडम यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.