spot_img
spot_img
spot_img

चित्रपट नाहीतर एक चळवळ असलेल्या ‘अवकारीका’चा टीझर समोर

बरेच दिवसांपासून ‘अवकारीका’ या चित्रपटा अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवलेली पाहायला मिळाली. हा एक चित्रपट नाहीये तर ही एक चळवळ आहे. हा एक सामाजिक आरसा आहे. एक भविष्य घडवण्याचा निर्धार आहे. अखेर या चित्रपटाच्या समोर आलेल्या टिझरने चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच ताणून धरली आहे. तर चित्रपटात नेमकी काय कथा असणार याची झलकही दर्शवली. उद्योगीकरण, वाढती लोकसंख्या यामुळे होणाऱ्या कचऱ्याच्या मोठ्या प्रमाणामुळे नागरी वस्तीवर त्याचा किती परिणाम होतो हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. एका कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्याच्या भूमिकेतून ही कथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. अर्थात यावेळी त्या कर्मचाऱ्याचं मन नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करतोय हे चित्रपटातून पाहायला मिळेल, असं टिझरवरून स्पष्ट होतं. चित्रपटाचे दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांनी चित्रपटात म्हटलं आहे की, “स्वच्छता हा निसर्गाचा अलिखित नियम आहे. आपण निसर्गाचा एक भाग आहोत, निसर्गाची नकारात्मकता आता वाढत असल्याचं दिसत आहे, आणि याची जाण प्रत्येक नागरिकाला व्हावी म्हणून हा चित्रपट दिग्दर्शित करण्यात आला आहे”.

‘रेडबड मोशन पिक्चर’ या बॅनर अंतर्गत ‘अवकारीका’ हा चित्रपट येत्या १ ऑगस्ट पासून रसिकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी सांभाळली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे. अभिनेता विराट मडके चित्रपटात स्वच्छता दूताच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटात राहुल फलटणकर, रोहित पवार आदी कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीत अरविंद भोसले यांचे असून छायांकन करण तांदळे तर संकलन अथर्व मुळे यांचे आहे. सहदिग्दर्शक रहमान पठाण तर लाईन प्रोड्यूसर म्हणून चेतन परदेशी यांनी बाजू सांभाळली आहे. श्रेयस देशपांडे यांचे संगीत असून गायक कैलास खैर, सुनिधी चव्हाण, ज्ञानेश्वर मेश्राम यांचे स्वर चित्रपटातील विविध गीतांना लाभले आहेत. येत्या १ ऑगस्टला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!