spot_img
spot_img
spot_img

कुणाल आयकॉन कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा वेग वाढवून सदर रस्त्याचे काम पूर्ण करा- शत्रुघ्न काटे.

बुधवार दि.०९/०७/२०२५ रोजी पिंपळे सौदागर या ठिकाणी प्रकल्प विभागामार्फत कुणाल आयकॉन रोड याठिकाणी सुरू असलेल्या १२ मी. व १८ मी.रस्त्याच्या काँक्रेटिकरण कामाची पाहणी नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केली.

गेली अनेक दिवसांपासून कुणाल आयकॉन रस्ता अद्यावत पद्धतीने विकसित करण्याचे काम प्रकल्प विभागामार्फत सुरु आहे.कामात येणाऱ्या विविध अडचणी मूळे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा वेग मंदावला असल्याणे कुणाल आयकॉन रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीची समस्येमूळे नागरिक हैराण झाले आहेत.

या विषयी गांभीर्याने दखल घेत भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री शत्रुघ्न (बापु) काटे यांनी आज सदर रस्त्याच्या कामाची पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला.त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे झाले आहेत अश्या ठिकाणी पावसामुळे पाणी भरल्याने अपघाताची शक्यता लक्षात घेता तातडीने खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा अश्या सूचना दिल्या आहेत.

तसेच या पाहणी दरम्यान रस्त्याच्या कामाचा वेग वाढवून सदर रस्त्याचे काम पूर्ण करावे तसेच लवकरात लवकर सदर रस्ता नागरिक वाहतूकसाठी खुला करण्याच्या सूचना श्री.शत्रुघ्न काटे यांनी संबंधित विभाग अधिकारी यांना दिले.यावेळी प्रकल्प विभाग कार्यकारी अभियंता सुनील पवार,कनिष्ठ अभियंता केतकी कुलकर्णी,टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड कॉर्डिनेटर भीमाशंकर भोसले,इन्फ्राकिंग कन्सल्टंट लीडर पतंगे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!