शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ३८ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ एक आणि परिमंडळ दोन मधून करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
आगामी महानगर पालिका निवडणूका आणि गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातं आहे. हत्या, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, अपहरण, मारामारी अशा गंभीर गुन्हे असलेल्या ३८ सराईत गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. २० ते ४८ वयोगटातील हे गुन्हेगार आहेत.
दोन वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातून त्यांना हद्दपार करण्यात आलं. तर, काही जणांना एक वर्षांकरिता तडीपार करण्यात आलं आहे. संघटीत टोळ्यांच्या प्रमुखांचा यात समावेश आहे. ही कारवाई केल्याने पोलिसांचं कौतुक होत आहे. याआधी ही शेकडो जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.