शबनम न्यूज | प्रतिनिधी
देहूरोड-गांधीनगर भागात जुगार खेळत असलेल्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकत सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (दि. ७) दुपारी सव्वादोनच्या सुमारास करण्यात आली.
रमजान मोहम्मद हानिफ शेख (वय ५२, रा. ओटास्कीम, निगडी), शशिकांत सुभाष मोरे (४३, रा. दत्तनगर, मोहननगर), अनिल छगन अक्कर (७२), प्रेमदास दौलत चितारे (७२), सूरज बापू साथाळे (३६), लक्ष्मण राम कोवेम्मुला (६५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार पंकज भदाने यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.