शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरातील ७० वर्षावरील सर्व नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळविण्यासाठी ‘आयुष्यमान वय वंदना कार्ड’ काढून मिळणार असून; येत्या सोमवार (दि. ७ जुलै २०२५) रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत, शामभाऊ जगताप जनसंपर्क कार्यालय, भीमाशंकर कॉलनी, दापोडी रोड, पिंपळे गुरव, येथे काढून मिळेल, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांच्या वतीने देण्यात आली आहे.
शाम भाऊ जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदर अभियान सुरू करण्यात आले असून, या अभियानाला प्रचंड प्रतिसाद पाहावयास मिळत आहे. ७० वर्षावरील नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात या अभियानाला प्रतिसाद देत आहेत. ७० वर्षावरील नागरिकांनी फक्त आपले आधार कार्ड घेऊन यावे व सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाम भाऊ जगताप यांनी केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय
ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय ही संकल्पना गेल्या अनेक वर्षापासून शाम भाऊ जगताप यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. शाम जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ वाचनालय करण्यात आले असून या वाचनालयात अनेक ज्येष्ठ नागरिकांची पेपर व इतर साहित्य वाचनासाठी नेहमी मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळते. ज्येष्ठ नागरिकांना पेपर वाचून व इतर विरंगुळा केंद्र हा यामागील हेतू आहे. ज्येष्ठ नागरिक आपला वेळ घालविण्यासाठी व ज्यांना वाचनाची आवड आहे, अशा नागरिकांसाठी आपण हे वाचनालय सुरू केले असल्याचे शाम भाऊ जगताप यांच्या वतीने सांगण्यात आले. अनेक वर्षापासून हे वाचनालय सुरू असून येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजनेची माहिती ही दिली जाते. शाम भाऊ जगताप यांचे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून अशी अनेक उपक्रम अनेक वर्षापासून सुरू आहेत.