शबनम न्यूज | प्रतिनिधी
समाजातील विविध क्षेत्रांत अडचणीत सापडलेल्यांची आगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत व सेवा करण्यात पुढाकार घेणारा अवलिया म्हणजे किशोर पवार होय. अगदी अडचणीत सापडलेला तरुण, असो
की गरीब विद्यार्थी. बेरोजगार तरुणांना धंदा, नोकरीबाबत मार्गदर्शन, गरीब विद्यार्थ्यांना शाळेची फी, गणवेश व वह्या पुस्तकांची मदत करण्यापासून ते वारकऱ्यांची सेवा करण्यापर्यंत ते सदैव पुढे असतात.
नुकतेच पार पडलेल्या संत ज्ञानेश्वर माउली आणि तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पंढरपूरात पोचेपर्यंत त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी पवार यांनी स्व: खर्चातून चहा पाजण्याचे अनोखे कार्य त्यांनी पार पाडले. गंगानगर (आकुर्डी) येथील किशोर पवार यांनी वारीदरम्यान आकुर्डी ते पंढरपूर 15
दिवस सव्वा लाख मोफत चहाचे वाटप करून पांडुरंगाची आगळीवेगळी सेवा केली.
आकुर्डीत केटरिंगचा व्यवसाय करताना गंगानगरमध्ये दर वर्षी पालखीतील सुमारे २ हजार
वारकऱ्यांना ते अन्नदान करतात. रोजच्या रोज चहा पुरवताना तारेवरची कसरत होत असे. मध्यरात्री २ वाजता उठून अंधारात पाणी व दुधासाठी भटकंती केल्यावर पहाटे ४ वाजेपर्यंत चहा वारकऱ्यांच्या हाती
न पोचणे असे कधी होत नाही. सकाळी ८ वाजेपर्यंत सुमारे 7 हजार वारकरी चहाने तृप्त होत. या
वारीत सुमारे सव्वा लाख वारकऱ्यांनी चहाचा आनंद घेतला.
पालखीसोबत असलेल्या ३५० दिंड्यांना चा वाटपासाठी पवार यांच्यासोबत एका टेंपोसह 6 सेवेकरी तैनात होते. पवार व सहकाऱ्यांनी अंधारात, रस्त्यावर खूप कष्टत 15 दिवस काढले. मात्र, सेवा केल्याने या सर्वांचा उत्साह अद्याप कमी झाला नव्हता. हे कार्य अखंडित सुरू ठेवणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
वारीत 15 दिवस सेवा चहाची तलफ कमीच भागवत असलेल्या पवार यांनी पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांना चहाचे वाटप करण्याचा संकल्प 10 वर्षापूर्वी केला. गेल्या वर्षी 15 दिवस चहाचे वाटप केले. तर यावर्षी 15 दिवस चहा देऊ वारकऱ्यांची तलफ भागवली. दररोज 12/ 13 हजार वारकरी पवार
यांच्या चहाचा आस्वाद घेत होते. यासाठी ५ क्विंटल साखर, 85 किलो चहा पावडर,900 लिटर दूध तर दूध पावडर १०० किलो, इलायची ३ किलो लागली. कोरोना काळात दोन वर्षे वारी ऐवजी आषाढी एकादशी पोलीस स्टेशन, दवाखाने यांना चहाचे वाटप केले.
या कार्यासाठी अनुराग पवार,अरुणा पवार, ज्ञानेश्वर पवार, राजू फडके, विनोद कवडे, अजय पवार, अरबाज सय्यद यांचे सहकार्य लाभले.