शबनम न्यूज | प्रतिनिधी
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई रविवारी (६ जुलै) सायंकाळी पुणे-मुंबई महामार्गावर घोरवडेश्वर डोंगराजवळ करण्यात आली.
अशोक बाळू भारती (२२, कासार आंबोली, मावळ), प्रशांत उर्फ पैलवान शांताराम आंबेकर (२६, देवळे, मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रीतम सानप यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला प्रदीप सिरॅमिक क्रोकरी समोर दोघेजण पिस्तूल घेऊन आले असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली.