शबनम न्यूज | प्रतिनिधी
बाणेरमध्ये अग्निशामक केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात अत्याधुनिक अशा उंच शिडीच्या २ अग्निशमन गाड्या (फायर व्हेइकल्स), अधिकारी आणि कर्मचारीवर्ग पालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या भागातील गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी अखेर पूर्ण झाली.
बाणेर-बालेवाडी भागातील वाढती लोकसंख्या, उंच इमारतींची संख्या आणि आपत्ती अथवा अपघाताच्या वाढत्या शक्यता लक्षात घेता, फायर स्टेशन ही प्राथमिक व अपरिहार्य गरज होती. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही सुविधा अत्यावश्यक होती. २०१८-१९ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आणि दीड वर्षापूर्वीच हे काम पूर्णत्वास आले होते. या संदर्भात २४ डिसेंबर २०२४ रोजी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन फायर स्टेशन तातडीने सुरू करण्याची ठाम मागणी केली होती.