spot_img
spot_img
spot_img

येत्या १३ जुलै रोजी कोथरूडमध्ये गांधी दर्शन शिबीर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार,दि.१३ जुलै २०२५ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात हे शिबीर होणार आहे.लेखक डॉ.अच्युत गोडबोले(कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाजावरील परिणाम),ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे(जागतिकीकरण),लेखक ऍड.शंकर निकम(भरकटलेला राष्ट्रवाद) हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. ‘ गांधी दर्शन’ विषयावरचे हे २२ वे शिबीर आहे.

अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी एड.स्वप्नील तोंडे (९९२३५२३२५४) तेजस भालेराव (९१७२४८७०१९),एड.राजेश तोंडे (९८९०१००८२०) यांच्याशी संपर्क साधता येईल.शिबिरासाठी प्रवेश शुल्क ऐच्छिक आहे.समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानावर आधारित हे शिबिर आयोजित केले गेले आहे.या शिबिरात सत्य,अहिंसा,सामाजिक बांधिलकी आणि स्वावलंबन यासारख्या गांधीजींच्या महत्त्वपूर्ण तत्त्वांवर सखोल चर्चा होईल.गांधीवादी विचारसरणी आजच्या जगातदेखील कशी उपयुक्त ठरू शकते, यावर प्रकाश टाकला जाईल. महात्मा गांधींच्या विचारधारेचे सखोल चिंतन आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले जाणार असून विचारांनी एक नवी दृष्टी आणि दिशा मिळेल.त्यामुळे सर्वांनी सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!