spot_img
spot_img
spot_img

पवना नदी सुधार प्रकल्पाला पर्यावरणाची मंजुरी ; संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शहराच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण (SEIAA) कडून अधिकृत पर्यावरण मंजुरी (Environment Clearance) व ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. हा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेण्यात आला. सादर करण्यात आलेल्या सविस्तर अहवालात प्रकल्पाच्या प्रत्येक पैलूची शास्त्रीय व तांत्रिक पातळीवर बारकाईने तपासणी करण्यात आली आणि अखेरीस प्रकल्पास मंजुरी देण्यात आली.या मंजुरीमुळे आता ₹1,434 कोटींचा प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या मार्गावर आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संदीप वाघेरे यांनी सातत्याने व सूत्रबद्ध पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित पर्यावरण व सिंचन विभागांशी समन्वय साधून वेळोवेळी आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली आणि प्रकल्पाची गरज अधिकृत स्तरावर मांडली.

SEIAA च्या मंजुरीतील ठळक बाबी:

पवना नदीतील सांडपाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी नवीन STP व ETP उभारले जाणार

नाल्यांमध्ये येणाऱ्या औद्योगिक व घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्क्रिनिंग यंत्रणा व इंटरसेप्टर ड्रेनेज योजनेची अंमलबजावणी

84 नाल्यांमधून होणारे थेट प्रदूषण रोखण्याचे ठोस उपाय

18,455 नवीन झाडांचे वृक्षारोपण व जैवविविधतेचे जतन

SEIAA च्या स्पष्ट अटींसह पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने 100% अनुपालन

याबाबत अधिक माहिती देतांना वाघेरे म्हणाले “ही फक्त मंजुरी नाही, तर पिंपरी-चिंचवड शहराच्या नद्यांसाठी नवजीवन देणारा निर्णय आहे. गेल्या काही वर्षांपासून मी सातत्याने प्राधिकरणांकडे यासाठी पाठपुरावा करत होतो. आता ही मंजुरी मिळाल्याने पवना नदी स्वच्छ व शुद्ध करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. लवकरच निधीसाठीही आपण अधिकृत स्तरावर पावले उचलणार आहोत.

SEIAA च्या अधिकृत दस्तऐवजामध्ये स्पष्ट नमूद आहे की, 

 “SEIAA decided to grant Environment Clearance.”

(अनुवाद: SEIAA ने पर्यावरण मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे.)

या महत्त्वाच्या पर्यावरणीय निर्णयामुळे पवना नदीचे स्वच्छ, सुंदर व जीवनदायिनी रूप पुन्हा दिसणार आहे. या यशामागे असलेली दूरदृष्टी, नियोजन आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी संदीप वाघेरे यांनी उत्तमरित्या पार पाडली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!