शबनम न्यूज | प्रतिनिधी
निगडी कडून आकुर्डी कडे जाणाऱ्या जुना मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वरील पुलाशेजारील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्यामुळे अनेक अपघात येथे घडत आहेत. सदरील खड्डे अतिशय घातक असून आतापर्यंत बऱ्याच नागरिकांना या अपघाताला सामोरे जावे लागले आहे, याकरिता सदर परिसरातील रस्ते विषयी येत्या १० जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली आहे.
भक्ती शक्ती ते निगडी जाणारा मार्ग येथील श्रीकृष्ण मंदिर समोरील रस्त्यावर मागील एक वर्षापासून खड्डे खोदून ठेवलेले आहेत व तेथे जाण्याचा मार्ग बंद करून ठेवण्यात आलेला आहे. अनेक वेळा मेट्रो अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही सदरील काम झालेले नाही, तरी या संदर्भात येत्या १० जुलै रोजी मनसेवतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.