spot_img
spot_img
spot_img

आषाढी एकादशी निमित्त विविध अध्यात्मिक कार्यक्रम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या पावन दिवशी श्री व्यंकटेश्वरा ट्रस्ट, बालाजी मंदिर, मोहननगर यांच्या वतीने विविध अध्यात्मिक आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन अध्यक्ष सतिश सीलम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अभिषेक व नामस्मरणाने झाली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी पूजन, बालाजी अभिषेक, तसेच वेदघोषासह श्री विष्णू सहस्रनाम पठण पार पडले.

या दिवशी विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे ‘सुवर्ण संगीत भजनी मंडळ’ यांचे भजन व दृष्टीहीन मुलांनी सादर केलेला हृदयस्पर्शी भजन कार्यक्रम, ज्यांनी उपस्थित भाविकांच्या मनाला भावनिक स्पर्श दिला. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले.

अध्यक्ष सतिश सीलम यांनी स्वतः कार्यक्रमात उपस्थित राहून भक्तांना मार्गदर्शन केले आणि सर्व स्वयंसेवक, कलाकार व भाविकांचे मनःपूर्वक आभार मानले. श्री व्यंकटेश्वरा ट्रस्ट यांच्या वतीने या पवित्र कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार व्यक्त करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!