spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी ॲड. रामराजे जी. भोसले पाटील यांची नियुक्ती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र, अध्यक्षपदी ॲड. रामराजे जी. भोसले पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यसभेचे माजी खासदार श्री. अमर साबळे, श्री. शंकर जगताप (आमदार चिंचवड विधानसभा), उमाताई खापरे (आमदार विधान परिषद), श्री. अनुप मोरे (अध्यक्ष भारतीय युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश), प्रदेशाध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली, यांनी कार्याध्यक्ष ॲड. यशवंत खराडे, सचिव ॲड. प्रवीण नलावडे, प्रदेश सदस्य ॲड. दिनकर बारणे, प्रदेश प्रवक्ता ॲड. शंकर वानखेडे, पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ॲड. आतिश लांडगे यांच्या उपस्थितीत ॲड. रामराजे जी. भोसले पाटील यांना नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले.

ॲड. रामराजे जी. भोसले पाटील यांनी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी मागील वर्षी चांगल्या पद्धतीने काम पाहिले असून, त्यांनी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदावर काम करीत असताना नोटरी वकील बंधू, भगिनी यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा व प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!