शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवडमधील गीलामंदिर विद्यालयात पालखी सोहळा उत्साहात पार पडला. आकर्षक फुलांनी सजवलेली पालखी आणि त्यामध्ये विष्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. शाळेतील सर्व विदयार्थी वारकरी वेशभूषेत आले होते. विदयार्थिनी नऊवारी साडी तसेच डोक्यावर तुळस घेऊन सहभागी झाल्या होत्या. ‘जानोबा माऊली तुकाराम ‘च्या जयघोषात शाळा व परिसर दुमदुमून गेला होता.
पालखी सोहळ्यात सर्व विदयार्थी, शिक्षक सहभागी झाले होते, पालखीचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र भोसले सर यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन सौ वाहळ मॅडम यांनी केले होते. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते.