शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारतीय जनसंघाचे संस्थापक, शिक्षणतज्ञ आणि महान देशभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे मोरवाडी, पिंपरी येथील कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष शत्रुघन (बापू) काटे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाजप शहराध्यक्ष शत्रुघन (बापू) काटे म्हणाले, “डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक महान राष्ट्रभक्त होते ज्यांनी आपले जीवन देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी समर्पित केले. त्यांनी ‘एक देश, एक विधान, एक निशान’ (एक देश, एक संविधान, एक ध्वज) या तत्त्वासाठी लढा दिला आणि काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांचे कार्य आणि विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. आजच्या दिवशी आपण त्यांच्या दूरदृष्टीचे आणि त्यागाचे स्मरण करतो. भाजप पक्ष त्यांच्या आदर्शांवर चालत राष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.”
या कार्यक्रमाला प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, माजी महापौर आर.एस. कुमार, माजी नगरसेवक सुरेश भोईर, योगिता नागरगोजे, रवींद्र देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, कैलास सानप, मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, मोहन राऊत, मंगेश धाडगे, अनिता वाळुंजकर, वैशाली खाड्ये, कविता हिंगे, गोरक्षनाथ झोळ, खंडूदेव कठारे, संजय पटनी, आदेश नवले, भूषण जोशी, मनोज ब्राह्मणकर, विठ्ठल भोईर, विजय रनदिल, गणेश आर. ढाकणे, दत्तात्रेय ढगे, संजय परळीकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.