शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्वर्गीय हिराबाई किसनराव लांडगे यांच्या पुण्यस्मरणार्थ, आमदार पैलवान महेश दादा लांडगे युवा मंच, सौ कीर्तीताई मारुती जाधव युथ फाऊंडेशन,श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्यावतीने
कृष्णा नगर प्रभागातील शिवाजी पार्क येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी उपवास फळ वाटप कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने आणि सेवाभावी वातावरणात पार पडला.
स्व. कै. हिराबाई किसनराव लांडगे यांच्या पुण्यस्मरणार्थ या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन मारुती जाधव आणि सौ किर्ती मारुती जाधव यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
यावेळी आलेल्या भाविकांनी पंढरपूरची वारी मंदिरातच अनुभवली. जे भाविक प्रत्यक्ष पंढरपूर वारीस जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी या मंदिरातच विठ्ठलनामाच्या गजरात, एकात्मतेच्या भावनेत हा कार्यक्रम पार पडला. विठ्ठलाची प्रार्थना, भक्तिमय वातावरण, आणि फराळ वाटप यामुळे पंढरपूरचीच अनुभूती लाभली. या प्रसंगी सर्वच वयोगटांतील उपवास करणाऱ्या महिला, पुरुष व बालकांसाठी स्वादिष्ट फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थितामध्ये भास्कर गावडे , प्रभाकर भोळे, शिवानंद चौगुले,संतोष जाधव, धनंजय जाधव, संदीप दीक्षित, निवृत्ती म्हेत्रे, लहू म्हेत्रे, कृष्णा जाधव तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.