- प्रतिक्षा घुले यांची खासदार आप्पा बारणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
गाव मौजे बोपखेल हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरात येत असुन,गेल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत दापोडी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येते गावची लोकसंख्या २५००० च्या आस-पास असुन या परीसरात बोपखेल गावठाण ,रामनगर झोपडपट्टी व गणेशनगर असा मोठा रहिवास भाग आहे, या भागात पोलिस चौकी सुरु करण्यात यावी, अशी मागणी युवा सेनेच्या प्रतिक्षा घुले यांनी खासदार आप्पा बारणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटल आहे कि, सदर ठिकाणी पोलिस चौकी नसल्याने कायद्याचा धाक गुन्हेगारांना राहिला नाहिये, छोटे-मोठे गुंड व्यापाऱ्यांना त्रास देऊन पैशांची मागणी करतात तसेच अनेक अवैध धंदे येथे सर्रास चालु आहेत दादागिरी-भाईगीरी करणारे गुंड यांना धाक राहिलेला नाहिये, पोलिस चौकी नसल्याने व पोलिस स्टेशन लांब असल्या कारणांमुळे सामान्य नागरीक त्यांनी काहिही हैदोस घातला तरी त्यांना प्रतिकार करण्याची हिंमत करत नाहिये, ह्या अशा घटनांमुळे येथील वातावरण बिघडले असून किशोरवयीन व युवा पिढी त्या गुंडांचा आदर्श घेत आहे व त्यामुळे बाल-गुन्हेगार, वेगवेगळ्या प्रकारची व्यसने करणारे तरुण यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे परीणामी येणारी पिढी चुकीच्या गोष्टींचा आहारी जात आहे तसेच अशा समाजविघातक प्रवृत्ती वाढतं चालल्या आहेत, बोपखेल- खडकी उड्डाणपूल झाल्यामुळे रहिवाशी विभाग वाढत चालला आहे परिणामी लोकसंख्या हि वाढत चालली आहे., म्हणुन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस चौकी असणे गरजेचे आहे, याबाबत पोलिस प्रशासना सोबत वारंवार पत्रव्यवहार करुन देखील अद्यापही बोपखेल येथे पोलिस चौकी झालेली नाहिये, तरी बोपखेल येथे पोलीस चौकी मंजुर करण्यात यावी, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आला आहे.