शबनम न्यूज | प्रतिनिधी
कु.दुर्गा अभय भोर, अध्यक्ष, दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य आणि पिंपरी चिंचवड महिला उद्योजक संघटना यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गा अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन वाढदिवसानिमित्त दुर्गा अभियान अंतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, लघुउद्योग मार्गदर्शन व वृक्षारोपण असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.
या उपक्रमांतर्गत महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून, त्यांना आत्मरक्षा तंत्र शिकवून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा उद्देश साधण्यात आला.
तसेच लघुउद्योग मार्गदर्शनाद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व प्रेरणा देण्यात आली. याशिवाय पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून समाजात हरित संदेश पोहोचवण्यात आला.
या उपक्रमांमुळे महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळून सामाजिक जाणीवा अधिक बळकट होणार आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने समाजहिताच्या या उपक्रमांना मोठा प्रतिसाद लाभला असून, मोठ्या संख्येने महिलांनी आणि नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला याप्रसंगी वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक दीपक साळुंखे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर आणि अनेक महिला भगिनी तसेच उद्योजकांच्या हस्ते परिसरात वृक्षरोपण करण्यात आले तसेच महिलांना उद्योजकतेचा माहिती आणि मार्गदर्शन उद्योजक संघटनेचे अध्यक्ष अभय भोर यांनी केले.
महिलांना स्व प्रशिक्षणार्थ धडे कुमारी अवंतिका भोर आणि मोहसिना शेख हिने दिले तसेच महिलांना सुरक्षेबाबत माहिती आणि धडे भोसरी स्पाईन रोड, दामिनी पथकाच्या सरस्वती काळे आणि मोनिका वरपे यांनी दिले. तसेच कुमारी दुर्गा भोर यांच्या शुभहस्ते महिला कामगारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विशेष उपस्थिती बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.