शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी : वेद स्पर्श क्लिनिक व वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने देशाचे शूर वीर असे भगत सिंह,राजगुरू,सुखदेव या तीन वीर जवानांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वूई टुगेदर फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य,नागरिक चिंचवड येथे अभिवादन करण्यासाठी एकत्र आले.
वूई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी या वीर देशपुत्रांना पुष्प वाहून विनम्र आभिवादन केले.डॉ. गीतांजली क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर वूई टुगेदर सचिव,आदर्श शिक्षिका मंगला डोळे – सपकाळे यांनी या वीर जवानाविषयी उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली.या वीर पुत्रांचा इतिहास मंगला डोळे – सपकाळे यांनी खूप छान रित्या सांगितला या वेळी इन्कलाब जिंदाबाद!!भारत माता की जय!!अश्या घोषणा देण्यात आल्या.
या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, सलीम सय्यद,सचिव,जयंत कुकलर्णी, खजिनदार,दिलीप चक्रे,मंगला डोळे – सपकाळे, दिलीप पेटकर,रवींद्र काळे,शंकर कुलकर्णी, रवींद्र सागडे, अरविंद पाटील,वेदस्पर्षचे, डॉ.गीतांजली क्षीरसागर, समीर दरेकर,संतोष भवर, प्रतीक्षा इंगळे,मोनाली खांडेकर,हेमलता सुतार, अनिता मुंडे, आदी पदाधिकारी,सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.