शबनम न्यूज | प्रतिनिधी
नवनगर शिक्षण मंडळ आकुर्डी,पुणे ३५,संचलित श्री सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी,पुणे ३५ या शाळेचा “आषाढी एकादशीचा” कार्यक्रम निगडी प्राधिकरण,पुणे ४४ येथील संत श्री तुकाराम महाराज उद्यान येथील विठ्ठल रुखमाई मंदिरामध्ये उत्साहात संपन्न झाला.या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चंद्रभागेच्या तिरी,भजनात भक्तांच्या,माऊली माऊली,नाचू लागला अशी भजने सादर करून उपस्थितांची मने जिंकली व वातावरण भक्तीमय केले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमच्या संस्थेचे संस्थापक,सचिव माननीय गोविंदराव दाभाडे सर होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेदिका कोशिरे व मीरा मगर,निवेदन दिपल पाटील या विद्यार्थिनींनी केले.इरण्णा धनशेट्टी,आरमान पठाण,दिव्या सोळंके या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त भाषण केले.शिक्षक मनोगतामध्ये प्रतिमा काळे यांनी माणुसकीची दर्शन घडविणारी वारी सर्वांनी करावी तसेच सौ.नयना पाटील यांनी भक्त पुंडलिकाप्रमाणे आई-वडिलांची सेवा करावी त्यांची अपार भक्ती ठेवावी त्यातूनच आपल्याला शांती समाधान मिळते असे विचार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रतिमा काळे,सविता पाटील,.नयना पाटील,कैलास कोशिरे,श्री.चतुर आखाडे व अविनाश आखाडे आदी शिक्षकांनी केले होते.