पिंपरी चिंचवड :
कृष्णानगर मधील केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्रीस्कूलमध्ये लहान चिमुकल्यानी वारीचा आनंद घेतला. तसेच महात्मा फुले नगर मधील गणपती मंदिरात जाऊन सर्वांनी दर्शन घेऊन विठू नामाचा गजर देखील केला. यावेळी खूप छान वेशभूषा करून आलेले चिमुकले अतिशय आनंदात दिसत होते.
स्कूलमध्ये छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बनवून मुलांना अतिशय योग्य मार्गदर्शन करण्यात आले दर्शनाचा लाभ देण्यात आला. तसेच सर्व चिमुकल्यांना व पालकांना तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. स्कूल मधील सर्व टीचर्स अतिशय परिश्रम घेऊन कार्यक्रम छान पद्धतीने करण्यात आला. कृष्णा नगर ब्रांच ओनर कीर्ती मारुती जाधव यांनी आभार व्यक्त केले.