शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय महाराष्ट्र’ ऐवजी ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर राजकीय पक्षांच्या गीतांकडून टीका करण्यास सुरुवात झाली.
दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर आता “केम छो शिंदे साहेब” म्हणत शिवसेना मराठी माणसासाठी उभी केली होती. ‘विना शकले विपरीत बुद्धी’ तसेच ठाण्यात मराठी जास्त आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांचे मते मिळावीत म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे उच्चार केले असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर केली आहे.