शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुण्यामध्ये एका कुरियर बॉय ने एका २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार केले. ही धक्कादायक घटना यापुढे घडू नये, याकरिता पुणे शहरातील कुरिअर डिलिव्हरी एजंट बाबत कठोर नियमावली करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका तथा माजी नगरसेविका सुलभाताई उबाळे यांनी केली आहे.
त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन पुणे जिल्हा निबंधक संजय राऊत यांना दिले. तसेच घरोघरी कुरिअर पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी कुरिअर एजंट बाबत तातडीने कठोर नियमावली करावी, अशी मागणी केली. बलात्कार सारख्या घटना घडत आहेत, कुरियर डिलिव्हर करणाऱ्या कंपनीने आपल्या कुरियर बॉय बाबत संपूर्ण माहिती घ्यावी व आपल्या कार्यप्रणाली बाबत कठोर नियमावली करावी व संभाव्य धोक्यापासून महिला व मुलींचे रक्षण होईल असे नियम करावे, अशी मागणी सुलभाताई उबाळे यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत संपर्कप्रमुख पूजा रावतेकर, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अक्षदा धुमाळ ,कसबा विधानसभा उपशहर प्रमुख अश्विनी मल्हारी आदी उपस्थित होत्या.