शबनम न्यूज | प्रतिनिधी
दुर्गा ब्रिगेड संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कु. दुर्गाताई भोर यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष दिवशी “मी दुर्गा अभियान” अंतर्गत भव्य वृक्षारोपण, स्वयंरक्षण प्रशिक्षण तसेच लघुउद्योग मार्गदर्शन या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम अभय दादा भोर संपर्क कार्यालय एमआयडीसी भोसरी येथे उद्या म्हणजेच शनिवार दि.५ जुलै २०२५ रोजी भव्य वृक्षारोपण सकाळी ११ वाजता स्वयंरक्षण प्रशिक्षण आणि लघुउद्योग मार्गदर्शन कार्यक्रम सायंकाळी ०४ वाजता होणार आहे.
या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी स्वयंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार असून, युवक व युवतींना उद्योजकतेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.