शबनम न्यूज | प्रतिनिधी
जागतिक डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आवश्यक ‘नीट’ परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीच्या (एपीएमए) वतीने कौतुकाची थाप टाकण्यात आली. ‘पीएमए’तर्फे नुकत्याच झालेल्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्टमध्ये (नीट) चांगल्या गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.
बाणेर येथील बंतारा भवनात आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सचिन तपस्वी, ‘एपीएमए’चे संचालक डॉ. अभंग प्रभू, डॉ. अर्चना प्रभू, डॉ. हिमानी तपस्वी, प्रा. सचिन हळदवणेकर, समुपदेशिका डॉ. शीतल श्रीगिरी आदी उपस्थित होते. ‘एपीएमए’मध्ये मार्गदर्शन घेत गुणवत्ता यादीत आलेल्या तनिष्क दासवंत (देशात ४० वा, गुण ६५८), मानव वैद्य (देशात २७५ वा, गुण ६२८), श्रावणी पोरे (देशात ६५६ वी, गुण ६१४), रीजुल सांबरे (देशात ७०१ वी, गुण ६१२), तर निषाद लुब्री (देशात ७८० वा, गुण ६१०) या गुणवंतांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रसंगी बायोलॉजी विषयात देशात प्रथम आलेल्या रीजुल सांबरे हिचा विशेष सन्मान करण्यात आला.
‘नीट’ परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना करंडक आणि रोख रक्कम असे बक्षिस देऊन गौरविण्यात आले. तत्पूर्वी, अनेक विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, वादन असे कलाप्रकार सादर केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अथक परिश्रमाची तयारी, अभ्यासातील सातत्य आणि चिकाटी असेल, तर ‘नीट’ परीक्षेत यश संपादन करणे अवघड नाही. विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट करून त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करण्याला ‘एपीएमए’ प्राधान्य देते. त्यामुळेच यशाचा आलेख वाढत जातो आहे, असे ‘एपीएमए’चे संचालक डॉ. अभंग प्रभू यांनी केले.