शबनम न्यूज | प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोशिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्या वतीने वर्षीचा डॉक्टर्स डे चे औचित्य साधून ” डॉक्टर नागरिक संवाद”, आरोग्य चर्चा सत्र, तपासणी शिबीर या नावीन्यपूर्ण कार्यक्रम दि.५ – ६ जुलै रोजी संत तुकाराम नगर येथील आचार्य प्र के अत्रे नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष डॉ. ललितकुमार धोका यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
दि.५ जुलै संध्या ४ वा, उदघाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ अशोक नगरकर यांच्या हस्ते होणार आहे. संध्या ४ ते ८ या वेळात बाल आरोग्य व महिला आरोग्य यावर नागरिक व तज्ञांची चर्चा सत्रे होणार आहेत.
प्रथमोपचार(फर्स्ट एड वोर्कशॉप)आणि जीवन संजीवणी प्रत्यक्षिक ( सीपीआर डेमोनस्ट्रेशन) कार्यशाळाही घेतल्या जाणार आहेत.
तसेच आधुनिक जीवनशैलीतील तणाव व मानसिक आरोग्य यावर मार्गदर्शन सत्र होणार आहे.
यावेळी नागरिकांकडून प्राप्त प्रश्नांना उत्तरे दिली जातील व शंकांचे निरसन केले जाईल.
दुसरा दिवस – ६ जुलै सकाळी ८ वा दु ३ या वेळेत विविध चर्चा सत्र वा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल राजेश अगरवाल, रोटरी क्लबचे प्रांतपाल नितीन ढमाले हे उपस्थित राहणार आहे.
यामध्ये डोळे, कान -नाक-घसा, सांधेदुखी व हाडांचे आरोग्य, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग व थायरॉइड यावर चर्चासत्र होईल.
डॉक्टर-रुग्ण संबंध व वेळेनुसार होणारे वैद्यकीय प्रॅक्टिसमधील बदल, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य समस्या यावरही चर्चासत्र होणार आहे.
प्रबोधनासाठी ग्लोबल टॅलेंट विद्यार्थ्यांचे स्क्रीन टाइम व व्यसनमुक्ती यावर लघुनाटिका सादर करणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी भित्तीचित्र स्पर्धा सुद्धा होणार आहे.
गर्भाशयमुखाचा कर्करोग व लसीकरणातून प्रतिबंध यावरही लघु नाटिका डॉक्टर सादर करणार आहे. व हे लसीकरण( एचपीव्ही वॅक्सीन)9 ते 15 वयोगटातील मुलांना व मुलींना मोफत दिले जाणार आहे त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.
जनतेच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते संस्थांचा सत्कार होणार आहे. आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मोफत आरोग्याची तपासणी : रक्तदाब, मधुमेह, बीएमआय, बीएमडी वगैरे तपासण्या होणार आहेत.
या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी व संस्थेचे सभासदानी सहभागी होऊन चर्चासत्रे व कार्यशाळा यांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला सचिव डॉ मिलिंद सोनवणे, खजिनदार डॉ प्रकाश रोकडे, कार्य सदस्य डॉ विजय भळगट आदी उपस्थित होते.