शबनम न्यूज | प्रतिनिधी
पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना मंगळवारी (दि. १) दुपारी १:५५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. भट्टी आळी, बावधन बुद्रुक येथे हा प्रकार घडला. प्रकाश नागनाथ जाधव (४३, रा. बावधन बुद्रुक), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. प्रवीण प्रकाश जाधव (१८) यांनी मंगळवारी (दि. १) याबाबत बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेव्हा बेडरूममध्ये गेले, तेव्हा त्यांच्या आईला बेशुद्धावस्थेत पडलेले पाहिले. तिच्या तोंडाला फेस आणि गळ्यावर लालसर व्रण दिसले. वडील घटनास्थळावरून रुग्णवाहिका आणण्याच्या बहाण्याने निघून गेले. त्यामुळे खून झाल्याचा संशय निर्माण झाला. फिर्यादी प्रवीण यांच्या आई-वडिलांचे सतत भांडण व्हायचे. वडिलांची नोकरी गेल्याने त्यांना सतत आर्थिक चणचण भासत होती. वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून आई-वडिलांमध्ये वाद होत असत. या कारणावरून फिर्यादीचे वडील प्रकाश यांनी फिर्यादीच्या आईचा गळा दाबून खून केला, असे फिर्यादीत नमूद आहे.