शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील आपल्या पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे महापालिकेच्या वतीने महाराष्ट्राला हेवा वाटावा असे महाराष्ट्रातील एकमेव वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क साकरण्यात येत आसून, जगातील ७ आश्चर्य असणाऱ्या वास्तु व इतर ऐतिहासिक वास्तु या स्मारकाच्या स्वरूपात येथे साकरण्यात येत आहे, हे थीम पार्क बनवताना टाकवू पासून टिकावू या मटेरियल चा वापर करून हे थीम पार्क साकरण्यात येत आहे, या थीम पार्क मध्ये एकूण १७ ऐतिहासिक वास्तु असणार आहेत, अशी माहिती मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी दिली.
त्यात जगातील ७ आश्चर्य असणारे ताज महल, आयफेल टॉवर, बुर्ज खलिफा, लीनिंग टॉवर ऑफ पिसा, सिडनी ऑपेरा हाऊस, अजंता कव्ह, ला सागराडा फॅमिलीया, चिचेन इतजा, पीरामीड ऑफ गिझा, पेट्रा ऑफ जोर्डन, कोलोसियम ऑफ रोम, बिग बेन ऑफ लंडन, अकोर वट ऑफ कंबोडिया, हंपी चारियट, स्टॅच्यू ऑफ लिबरटी, ट्रेव्ही फाउंटन, माऊंट रश्मोर. इत्यादी वस्तु साकरण्यात येणार आहे या संपूर्ण थीम पार्क साठी एकूण ११.०२ कोटी रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे, पिंपळे सौदागर येथे साकरण्यात येणारे हे थीम पार्क महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री आजितदादा पवार साहेब संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली होत आहे, हे वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क महाराष्ट्रातील एकमेव पार्क आसून यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील वैभवात भर पडणार आहे तसेच हे वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क पूर्ण झाल्यास महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ होणार आहे यात काही शंका नाही. हे थीम पार्क लवकरच पूर्ण होवून नागरिकांसाठी खुले होणार आहे, अशी माहिती संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी झालेल्या मीटिंग मध्ये तसेच नाना काटे यांनी कामाचा पाहणी वेळी दिली.