पिंपरी चिंचवड शहरातील गंगानगर भागात मागील अनेक दिवसापासून भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच येथील रहिवासी नागरिकांना या कुत्र्यांपासून मोठा धोका निर्माण झाला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला अनेक वेळा तक्रार देऊनही पालिका प्रशासन वतीने याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
याबाबतची दखल घेत आम आदमी पार्टी पक्षाचे चंद्रमणी जावळे यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ प्रभाग कार्यालयाकडे केली आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुलांना, महिलांना, विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास होत आहे. कुत्र्यांनी चावा घेतला तर रेबीज सारखे जीवघेणे आजार नागरिकांना होण्याचा धोका निर्माण झाला असल्याने या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी चंद्रमणी जावळे यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.