पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी:
पिंपरी चिंचवड शहरातील आम आदमी पक्षाच्या वतीने डॉक्टर दिनानिमित्त प्राधिकरण गंगानगर भागातील डॉक्टर सौ चव्हाण व पंचतारा नगर आकुर्डी येथील डॉक्टर पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
आम आदमी पक्षाचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष चंद्रमणी जावळे मामा यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टरांचा सत्कार केला.
तसेच बिर्ला हॉस्पिटल चिंचवड थेरगाव येथील डॉक्टर सौ. चव्हाण व डॉक्टर गौरव तसेच डॉक्टर शिंदे व इतर डॉक्टर टीमचा सन्मान आम आदमी पार्टीचे संस्कृत विभागाचे अध्यक्ष चंद्रमणी जावळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान आणि सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सौ मीनाताई जावळे यांनी केले.