spot_img
spot_img
spot_img

योगदान प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सत्कार समारंभ संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

योगदान प्रतिष्ठान व माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्यावतीने गेली २० वर्षांपासून १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सत्कार समारंभ आयोजित केला जातो. प्रत्येक वर्षी वेगवेगळे मार्गदर्शन माहिती पुस्तिका व बक्षीस दिले जाते.

या वर्षी सुधा सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २७२ गुणवंत विद्यार्थ्यांना जेष्ठ व प्रख्यात मार्गदर्शक विवेक वेलवणकर यांचे १० वी १२ वी नंतरच्या करिअर मार्गदर्शन पुस्तिका व बक्षिसे वाटप करण्यात आले, या वेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.किसन चौधरी महाराज उपास्थित होते. या संमवेत प्रमुख उपस्थिती नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, डॉक्टर अजित जगताप, माजी नगरसेवक मधुकर मास्तर चिंचवडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, गजानन महाराज सत्संग मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ धनवे ,मुख्याध्यापक महासंघाचे श्रीराम परबत गुरुजी, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, विद्युत वितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे, चाफेकर स्मारक समिती सदस्य, गतीराम भोईर, रवींद्र प्रभुणे, पंजाबराव मोंढे, मंगलदास खैरणार, तुकाराम चौधरी, सुरेश आगवणे,. अशोक कदम, सर्जेराव कोळी, हरिभाऊ मोहिते, शंकर वायचळे, कृष्णकांत काकडे, सुभाष मालुसरे, शिवाजी देशमुख, सुभाष पंडित, दत्तात्रय भोईर, सोनाताई गडदे, दिपालीताई कलापुरे, पल्लवीताई पाठक, सुरभीताई उमदी यांच्यासह जेष्ठ नागरिक विद्यार्थी व पालक बंधु भगिनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

ह.भ.प.किसन चौधरी महाराज यांनी करियर व पुढील वाटचालीसाठी अत्यन्त मौलिक व आपली संस्कृती संस्कार विषयी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. यांच्यासह डॉक्टर आजित जगताप व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार यांनी आपले मौलीक मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्थाविक मा नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर हांडे सर व विजयकुमार बोरसे सर यांनी केले तर आभार रवींद्र देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन योगदान प्रतिष्ठान व नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!