spot_img
spot_img
spot_img

ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवणाऱ्या भोंदुबाबाला अटक !

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोबाईल मधील छुप्या ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवणारा आणि मोबाईल कॅमेरातून खाजगी क्षण बघणाऱ्या भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे.  प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदू बाबाच नाव आहे.

त्याच्या विरुद्ध एका 39 वर्षीय व्यक्तींने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भोंदूबाबाच्या या प्रकारमुळे भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार या भोंदू बाबाने त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याच भासवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. या भोंदू बाबाने फिर्यादीच्या मोबाईल मध्ये एक छुपे ॲप डाऊनलोड केले. त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवला. फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या घटनांवर लक्ष ठेवले. इतकेच नाही तर फिर्यादीला अश्लील कृत्य त्याच बरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडले आणि मोबाईल ॲपद्वारे ते पाहिल्याचं फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे. या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादीचे म्हणणे आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या बाबा ने अशीच अनेकांची फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

आरोपी बाबा अगोदर भक्ताला जाळ्यात ओढत होता. तो भक्ताला तुमचा आकस्मिक मृत्यू होणार अशी भीती दाखवायचा. भक्त घाबरला की, त्याला या संकटातून वाचवण्याचे वचन द्यायचा. त्यासाठी मंत्रपूजा करण्याचे नाटक करायचा. भक्तांना एकांतात ध्यान करण्यास सांगायचा. त्याचदरम्यान भक्तांचा मोबाईल ताब्यात घ्यायचा. त्याचा पासवर्ड विचारायचा. मोबाईलमध्ये एअर ड्रॉइ़ड कीड ॲप डाऊनलोड करायचा. या ॲपच्या माध्यमातून तो भक्तांची हेरगिरी करायचा. ते सध्या कुठे आहेत. त्यांनी कोणते कपडे घातले आहेत. त्यांनी दिवसभरात काय काय केले यांची इत्यंभूत माहिती तो भक्तांना द्यायचा. त्यामुळे बाबाकडे कोणती तरी मोठी शक्ती असल्याचा विश्वास भक्तांना बसायचा.

बाबा जे सांगत असे ते भक्त करत असत. त्याच्यावर भक्तांचा कमालीचा विश्वास बसला होता. एका भक्ताचा मोबाईल सातत्याने गरम होत होता. तेव्हा त्याच्या एका मित्राला त्याने तो दाखवला. या मोबाईलमध्ये एक छुपे ॲप असून त्याच्यावर कोणीतरी पाळत ठेवत असल्याचे मित्राने सांगितले. काही दिवसांपूर्वी आपण केवळ बाबाच्या हातात मोबाईल दिल्याचे त्याला आठवले. त्याने इतर भक्तांना सुद्धा त्याची माहिती दिली आणि बाबाचे भिंग फुटले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!