शबनम न्यूज | प्रतिनिधी
हुंड्यासाठी तरुणीचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. याप्रकरणी पती, सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरोधात चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती प्रणिल निकुडे, सासरे उदय, सासू वैशाली, दीर प्रतीक (सर्व रा. वडगाव शेरी), चुलत दीर प्रमोद, चुलत सासरे माणिक (रा. कल्याणीनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तरुणीचा आरोपी प्रणिल निकुडे याच्याशी ऑक्टोबर २०२३ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर हुंड्यात काही वस्तू दिल्या नाही. आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, असे पती प्रणिलने तिला सांगितले. त्यानंतर पती प्रणिल, सासरे, उदय, सासू वैशाली, दीर प्रतीक, प्रमोद, चुलत सासरे माणिक यांनी तिला टोमणे मारून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला होता.