शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी न्यायालयात खोटी शालेय कागदपत्रे सादर करून आरोपीला अल्पवयीन भासवत जामीन मिळवण्याचे प्रयत्न केले. याप्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रभाकर शिवाजी आडे, ओम प्रभाकर आडे (दोघेही रा. नखातेवस्ती, रहाटणी), एक महिला आरोपी, उत्तम परशुराम राठोड (दोघेही रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे), जीवनदास सरेद्र (रा. बळीराम कॉलनी, रहाटणी) व इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिस उपनिरीक्षक एन. एम. सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली. सर्व आरोपींनी संगनमत करून बनावट शाळेच्या कागदपत्रांद्वारे आरोपी श्रीराम राठोड याचा जन्म १५ जानेवारी २००७ ऐवजी २००९ असा दाखवून न्यायालयात सादर केला.