शबनम न्यूज | प्रतिनिधी
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि लाईफ पॉइंट हॉस्पिटल वाकड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत इंदापूर तालुक्यातील लासुर्णे या गावी करण्यात आले होते.
या शिबिरात सर्दी, खोकला ,ताप ,थंडी, अंगदुखी, पाठ दुखी इत्यादींवर तपासणी करून डॉक्टरांनी औषधे दिली तसेच या शिबिरात वारकऱ्यांच्या हातापायांचे मसाज करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन दिंडीतील वारकरी ज्ञानेश्वर शिंदे आणि रामचंद्र भोसले, मच्छिन्द्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात वारकऱ्यांच्या तपासणीसाठी डॉ विनायक शेणवेकर डॉ सागर जैन डॉ नीरज पाटील मदत केली.एकूण ४६५ वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे संयोजन इंदापूर तालुक्यातील संस्कार प्रतिष्ठानच्या महिला निलावती भोसले, मोहिनी भोसले ,सुवर्णा भोसले, सुषमा भोसले, सुनिता भोसले, निता शिंदे, उज्ज्वला जाधव ,सावित्रा बनकर ,रुपाली भोसले, उर्मिला भोसले ,सावित्री बनकर आणि सायली सुर्वे, संध्या स्वामी, प्रदीप बांदल यांनी संयोजन केले होते.