शबनम न्यूज | प्रतिनिधी
वीर शिव छत्रपती संघटना आणि एस. आर. एन. फिल्म्स प्रॉडक्शन व न्यूज इंडिया 24 यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १४/०६/२०२५ रोजी नागपूर येथील कविवर्य सुरेश भट नाट्यमंदिर या ठिकाणी विदर्भ गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात श्रीमंत. डॉ. मुधोजीराजे भोसले महाराज ऑफ नागपूर ट्रस्ट व डी. वाय. एस. पी. मा. श्री. अशोकजी वाघुल यांचे हस्ते आकुर्डी, पुणे येथील श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर या शाळेच्या शिक्षिका लता अण्णा नवले ( सौ. शितल भानुदास औटी ) यांना विदर्भ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.