spot_img
spot_img
spot_img

राज्यातील ५२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राज्यातील पोलीस उपायुक्त दर्जाच्या ५२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी रात्री बदल्या करण्यात आल्याचा आदेश गृह विभागाने दिला. पुणे पोलीस दलातील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, पिंपरीतील उपायुक्त स्वप्ना गोरे यांची बदली करण्यात आली आहे.

वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांची दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. स्मार्तना पाटील यांची खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. शस्त्र निरीक्षण शाखेच्या अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांची राज्य राखीव पोलीस दलात (गट क्रमांक एक) अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त स्वप्ना गोरे यांची राज्य राखीव पोलीस दलात (गट क्रमांक दोन) येथे बदली करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातील परिमंडळ एकचे उपायुक्त सोमय मुंडे यांची पुणे शहर पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. सिंधुदुर्गचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषीकेश रावले यांची पुणे शहर पोलीस दलात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलातील अधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांची पुणे पोलीस दलात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!