शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे येथील माणुसकी फौंडेशन व अक्षदा विवाह संस्था यांच्या पुढाकाराने बिड येथील नितिन विमलकुमार जेगावकर, सिंधुदुर्ग येथील रेश्मा संभाजी कदम या दोन्हीही दिव्यांग वधु वरांचा विवाह हिंदू वैदिक विवाह पद्धतीने अतिशय थाटामाटात 26 जुन रोजी संपन्न झाला.
रेश्माला आई वडिल बहिण भाऊ कोणीही नाही आत्याने सांभाळ करुन तिला मोठे केले, तर नितीनला फक्त 90 पार केलेली आई त्यामुळे ती या विवाह सोहळ्यास ऊपस्थित राहु शकली नाही. Goodwill India यांच्या मार्फत संसारोपयोगी साहित्य (झाल), व भोजनाची व्यवस्था मा. कालिदास मोरे यांच्या माध्यमातून करण्यात आली. तर संध्या देशपांडे, भाग्यश्री मोरे, बालकल्याण संस्थेच्या मिनीता पाटिल, युवराज दिसले, मिलन पवार, जयश्री देशपांडे, सुर्योदय वृद्धाश्रमाच्या छायाताई भगत, व मायाताई, माणुसकी फौंडेशन च्या सौ. रसिका भवाळकर, सामाजिक कार्यकर्त्या ऊज्वला भोसले, मोनिका राऊत, मंगल पराते, निना भालशंकर, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष प्रताप थोरात, दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणारे हरिदास शिंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने वधु वरांना शुभेच्छा देण्यासाठी ऊपस्थित होते. दिव्यांग वधु वरांनी जात पात न मानता आपल्या अपेक्षांना मुरड घालून आपला जोडीदार निवडावा व एक आदर्श जिवन व्यतीत करावे असे मनोगत माणुसकी फौंडेशन चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भवाळकर यांनी या प्रसंगी व्यक्त केले. दिव्यांग वधु वरांचा एक परिचय मेळावा लवकरच आयोजित करण्याचा मानस असल्याचे सांगितले.