spot_img
spot_img
spot_img

‘डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ !

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळा दिनांक १६ जून रोजीपासून उत्साहात सुरु झाल्या. पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सुध्दा करण्यात आले. सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यवाटपासाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) उपक्रमातून शालेय व आवश्यक साहित्यांचे वाटप सुरु केले असून आत्तापर्यंत सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला असून शाळांकडून साहित्याच्या किटचे यशस्वीपणे वितरण करून एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने बॅंक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने, डिजिटल ई-रूपी पेमेंट प्रक्रिया राबविल्यामुळे साहित्य वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येऊन सदर प्रक्रिया जलदपणे राबविण्यात येत आहे.

तब्बल १४ दिवसांमध्ये १५ हजार विद्यार्थ्यांना मिळाले साहित्य !

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने थेट लाभ हस्तांतरण उपक्रमातून साहित्यांचे वाटप करण्यासाठी शहरातील वितरकांची नेमणूक केली असून त्यांच्याकडून डिजिटल ई-रुपी पेमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध होत आहे. शाळा सुरु होऊन आता १२ इतके दिवस झाले असून आत्तापर्यंत सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना साहित्य मिळाले आहे. अद्यापही विद्यार्थी व पालकांकडून साहित्य घेण्याची प्रक्रिया सुरु असून यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होईल. यामध्ये क्यू आर कोड द्वारे साहित्य वाटप केली असून तब्बल ४ कोटी रुपयांच्या साहित्याचे महापालिकेने विद्यार्थ्यांना वाटप केल्याचे शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगिता बांगर यांनी माहितीदेताना स्पष्ट केले.

भविष्यमध्येही ‘डीबीटी’ उपक्रमासाठी जलद आणि कार्यक्षम प्रक्रिया राबविणार !“चालू शैक्षणिक वर्षामध्येसुध्दा ‘डीबीटी’च्या यशस्वी अंमलबजावणीमुळे आमच्या विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेचे साहित्य पुरवता आले आहे. ई-रूपी सारख्या डिजिटल पेमेंट प्रक्रियेमुळे निधीचा कार्यक्षमतेने वापर करण्यात आला असून याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. गतवर्षी यशस्वी झालेल्या उपक्रमामुळे चालूवर्षीसुध्दा प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ घेता येत असून यापुढेही एकही विद्यार्थी सदर साहित्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत.”
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

‘डीबीटी’ उपक्रमातील अनेक आव्हानांवर मात करून विद्यार्थ्यांना मौल्यवान शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध !“ई-रूपी डिजिटल पेमेंट प्रक्रिया वापर करून आम्ही निधीचा कार्यक्षमपणे वापर केला आहे. त्याबरोबरच पालक आणि विद्यार्थ्यांकरिता पेमेंटची संपूर्ण प्रक्रिया सुलभ केली आहे. आमच्या समोरील विक्रेत्यांचे वर्गीकरण, दर्जेदार उत्पादनांची पडताळणी अशा आव्हानांवर मात करून आम्ही विद्यार्थांना मौल्यवान शिक्षण देत आहोत. आगामी काळामध्ये ‘डीबीटी’ उपक्रमामध्ये जलद आणि अधिक कार्यक्षम प्रक्रिया राबविण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
– प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

शैक्षणिक साहित्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही !“शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळण्यासाठी विभाग सर्व स्तरावर काम करित आहे. सर्व वितरकांकडून आत्तापर्यंत सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असून आता विविध टप्प्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यासाठी विभाग तत्पर असून एकही विद्यार्थी साहित्यापासून वंचित न राहता सर्वांना साहित्य मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत.”
– तानाजी नरळे, साहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!