spot_img
spot_img
spot_img

शहरात गुटखा विक्रीप्रकरणी दोन कारवाई

शबनम न्यूज | प्रतिनिधी

किराणा दुकानात ४८ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक केल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एकास अटक केली, तर एका फ्लॅटमध्ये ६४ हजार १३० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवल्याप्रकरणी मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने हिंजवडीमधून एकाला अटक केली. या प्रकरणी गुरुवारी (२६ जून) गुन्ह्यांची नोंद केली.

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ललित देवासी (२४, खेड, मूळ रा. राजस्थान) याला अटक केली आहे. पोलिस अंमलदार शरद खैरे यांनी फिर्याद दिली आहे. संशयिताने त्याच्या किराणा दुकानात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक

मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने तालब खान (४२, हिंजवडी) याला अटक केली. पोलिस अंमलदार समीर रासकर यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली. हिंजवडीत फ्लॅटमध्ये आरोपी तालब खान याने गुटखा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकून ६४ हजार १३० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!