शबनम न्यूज | प्रतिनिधी
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. २५) सायंकाळी चौधरी पार्कजवळ, वाकड येथे करण्यात आली. आफताब मेहबूब शेख (२४, रा. वाकड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिस अंमलदार गणेश गिरीगोसावी यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकडमधील चौधरी पार्कजवळ तरुण बेकायदेशीरपणे पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आफताब याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५१ हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळून आले.