spot_img
spot_img
spot_img

प्राचार्य प्रदीप कदम शांतिदूत सेवारत्न पुरस्काराने सन्मानित

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते आणि कॉनक्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड कॉम्प्युटर स्टडीज – चिखली या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप कदम यांना शांतिदूत परिवार आणि एल ओ सी हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५ च्या शांतिदूत सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्योजक रामदास माने, पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, जी एस टी आयुक्त शिवकुमार साळुंखे, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, पुणे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शांतिदूत परिवार संस्थेच्या अध्यक्षा विद्या जाधव, संत तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. प्रशांतमहाराज मोरे, प्राचार्य रामदास चौरे, गझलगायक भीमराव पांचाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य प्रदीप कदम यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या विषयांवर सुमारे २५०० हून अधिक प्रेरणादायी व्याख्याने दिलेली आहेत. प्राचार्य कदम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:शाल व्याख्याते म्हणूनही कार्यरत आहेत. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या तळागाळातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवाहात आणलेले आहेत. त्यांच्या समाजप्रबोधन आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!