spot_img
spot_img
spot_img

रॉयल फौंडशनच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

काळेवाडीः- काळेवाडी येथील रॉयल फाउंडेशन व रविभाऊ रमेश नांगरे यांच्यावतीने 10 वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन तसेच सत्कार समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रॉयल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अजय काटे, तुलसी नांगरे, सचिव सविता गोडेपाटील, सल्लागार दिपालीताई लोंढे, प्रमुख मार्गदर्शक प्रकाश नांगरे, आनंद काटे, उपसचिव गणेश नांगरे, विकी साळवे, विनोद वाघ, गोविंद ओहाळ, राजू शिंदे, कल्पना पाटील तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, दहावी व बारावी हे वर्ष करिअरचे प्रथम चरण आहे.  व या प्रथम चरणाचे गुरु हे आपले आई-वडील असतात. आपल्या आई-वडिलांच्या आज्ञात राहणे व त्यांच्याकडून मिळणारा आशीर्वाद हा या जगातला सर्वात मोठा आशीर्वाद मानला जातो. या धावत्या जगामध्ये जगत असताना मोबाईलचा वापर कमी करावा व आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी. आपले ध्येय हे निश्चित करावे व ते प्राप्त करण्यासाठी परिपूर्ण कष्ट व प्रयत्न करावे.
आज आपल्या समोर अनेक संधी उपलब्ध आहेत पण त्या संधीचे सोने करणे हे आपल्या हातात आहे. आपल्यासाठी कोणता   मार्ग योग्य आहे याची निवड आपण करायची आहे. आणि हे करत असताना आई-वडिलांच्या कष्टाचे विसर आपण पडू द्यायचे नाही.
चांगली संगत ही तुम्हांला यशाच्या शिखरावर घेऊन जाते, मात्र संगत जर बिघडली तर तुमचे आयुष्य उध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. दहावी आणि बारावीची ही एक पायरी अशी आहे की येथून तुमच्या खर्‍या आयुष्याला सुरूवात होते. आजच्या युगात पुस्तकी ज्ञानाबरोबरच आपल्या पाठीशी अनुभवची शिदोरी असणे तितकेच गरजेचे आहे. आयुष्यात तुम्हांला जर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही समोर एक ध्येय ठरावा आणि ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा ते करत असताना कदाचित अपयश देखिल येईल पण त्या अपयशाने खचून जाता पुन्हा प्रयत्न करा आणि एक दिवस असा येईल ते ध्येय तुम्ही साध्या कराला कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. ज्या ज्यावेळी तुम्हांला माझ्या मार्गदर्शनाची गरज वाटेल किंवा काही अडचण असल्यास मी सदैव मार्गदर्शन करण्यास तयार असेन असे ते म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!