spot_img
spot_img
spot_img

सिंहगड रस्ता भागात ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू

शबनम न्यूज

 पुणे : भरधाव ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील तुकाईनगर परिसरात घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सई श्रीकांत भागवत (वय १९ ,रा. भन्साळी कॅम्पस, तुकाईनगर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महाविद्यालयीन युवतीचा नावे आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपश्री श्रीकांत भागवत (वय ४८) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सई स. प. महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात होती. गुरुवारी (२६ जून) दुपारी ती दुचाकीवरुन घरी निघाली होाती. सिंहगड रस्ता भागातील तुकाईनगर परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार सईला धडक दिली. अपघतात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. अपघातानंर ट्रकचालक पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहेत. पोलीस उपनिरीक्षक कांजळे तपास करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!