spot_img
spot_img
spot_img

ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राचा चतुर्थ पदवी प्रदान सोहळा येत्या रविवारी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्या वतीने चतुर्थ पदवी प्रमाणपत्र वितरण व पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी करण्यात आले आहे. हा सोहळा पद्मावती येथील विणकर सभागृहात सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस संस्थेचे मार्गदर्शक व ज्येष्ठ उद्योगपती मनोज राठी, संपर्कप्रमुख श्रुती योगेश पिसे हे मान्यवर देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याने होणार आहे. या वेळी वास्तु विशारद, लोलक विशारद, अंक विशारद आणि वास्तु भूषण अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. या सोहळ्यास ज्योतिष व अध्यात्म क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या वर्षीच्या पदवी वितरण सोहळ्यात १२० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात सकाळी १० वाजता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल. यामध्ये विद्यावाचस्पती ज्येष्ठ गाणपत्य डॉ. स्वानंद पुंड महाराज यांना शारदा पुरस्कार, अभिनव ज्योतिष मंडळ सोलापूर या संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पंचांग कर्ते मोहन दाते यांना रत्नमाला पुरस्कार, योगीराज वेद विज्ञान आश्रम या पाठशाळेचे अध्यक्ष अश्वमेघयाजी चैतन्य नारायण काळे गुरुजी यांना वेद संवर्धन प्रेरणा पुरस्कार, वेदमूर्ती दत्तात्रय मनोहर साधले गुरुजी यांना वेदमार्ग दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ ज्योतिषतज्ञ शुभांगिनी पांगारकर यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर पुरोहितांचे मंगल मंत्र पठण, सान्वी फुंडकर यांचे सुसंस्कृत नृत्य आणि सन्मान समारंभ पार पडणार आहे.

दुपारी विशेष सत्रात विद्यार्थ्यांचे मनोगत तसेच प्रॅक्टिकल वास्तू व्हिजीट आयोजित करण्यात आली आहे. ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र हे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तूशास्त्र, अंकशास्त्र व ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देत आहे. आजवर या संस्थेतून ३,००० पेक्षा अधिक विद्यार्थी यशस्वीरीत्या प्रशिक्षित होऊन समाजसेवेच्या माध्यमातून स्वत:चे यशस्वी करियर घडवत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!