spot_img
spot_img
spot_img

Mahindra ची ही पॉप्यूलर SUV झाली स्वस्त! आजच घेऊन या घरी, पाहा फीचर्स आणि किंमत

एकीकडे, देशातील अनेक कार कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवत आहेत. त्याच वेळी, महिंद्राने आपल्या लोकप्रिय SUV XUV700 ची किंमत कमी केली आहे. महिंद्राची ही पॉवरफूल एसयूव्ही 75 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. XUV700 पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिएंटमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ही कार 6-सीटर आणि 7-सीटर कॉन्फिगरेशनसह येते. ऑटोमेकर्सनी अलीकडेच इंडियन मार्केटमध्ये XUV700 चे इबोनी व्हर्जन लाँच केले आहे.

महिंद्राने XUV700 चे काही व्हेरिएंट 75 हजार रुपयांनी तर काही व्हेरिएंट 45 हजार रुपयांनी स्वस्त केले आहे. स्वस्त झालेल्या व्हेरिएंटमध्ये AX7 L पेट्रोल AT 7S, AX7 L पेट्रोल AT 6S, AX7 L डिझेल MT 7S, AX7 L डिझेल AT 7S, AX7 L डिझेल MT 6S, AX7 L डिझेल AT 6S आणि AX7 L डिझेल AWD AT 7S चा समावेश आहे. XUV700 AX7 पेट्रोल AT 7S, AX7 पेट्रोल AT 6S, AX7 डिझेल AT 7S, AX7 डिझेल AT 6S आणि AX7 डिझेल AWD AT 7S या पाच व्हेरिएंटच्या किमती 45 हजार रुपयांनी स्वस्त झाल्या आहे.

या कारच्या पेट्रोल आणि डिझेल एंट्री-लेव्हल मॉडेल्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या अल्ट्रा-स्पेशल मिडसाईज एसयूव्ही XUV700 चे एबोनी लिमिटेड एडिशन इंडियन मार्केटमध्ये लाँच केले आहे. ज्यामध्ये ग्राहकांना Black आणि Silver चे जबरदस्त कॉम्बिनेशन मिळेल. या कारची एक्स शोरुम किंमत 19.64 लाख रुपये आहे. या कारचा लुक काहीसा ‘आउटशाइन द डार्क’ या थीमवर बेस्ड आहे. चला या कारचे फीचर्स आणि इतर डिटेल्स जाणून घेऊ.

महिंद्रा XUV700 इबोनी एडिशन व्हेरिएंट आणि किंमती

  1. XUV700 पेट्रोल MT – 19.64 लाख रुपये
  2. XUV700 पेट्रोल AT – 21.14 लाख रुपये
  3. XUV700 डिझेल MT – 20.14 लाख रुपये
  4. XUV700 डिझेल AT – 21.79 लाख रुपये

AX7 (7-सीटर फ्रंट व्हील ड्राइव्ह)

  1. XUV700 पेट्रोल MT – 19.64 लाख रुपये
  2. XUV700 पेट्रोल AT – 21.14 लाख रुपये
  3. XUV700 डिझेल MT – 20.14 लाख रुपये
  4. XUV700 डिझेल AT – 21.79 लाख रुपये

AX7 L (7-सीटर फ्रंट व्हील ड्राइव्ह)

  1. XUV700 पेट्रोल MT – उपलब्ध नाही
  2. XUV700 पेट्रोल AT – 23.24 लाख रुपये
  3. XUV700 डिझेल MT – 22.39 लाख रुपये
  4. XUV700 डिझेल AT – 21.14 लाख रुपये

इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, महिंद्रा XUV 700 Ebony Edition इंटिरियर फारच आकर्षित करणारे आहे. ब्लॅक लेदरेट अपहोल्स्ट्री, ब्लॅक-आउट ट्रिम्स आणि सेंटर कन्सोलवरील सिल्व्हर अ‍ॅक्सेंट्स तसेच डोअर पॅनल्स याला प्रीमियम लूक देतात. लाइट ग्रे रूफ लाइनर केबिन आणखीन चांगली दिसते. डार्क-क्रोम एयर वेंट्स याकारला आणखी खास बनवतात. एकंदरीत, याच्या इंटिरियरमध्ये मॉर्डन लक्झरी आणि एलिगेंस फीचर्स आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!