spot_img
spot_img
spot_img

गांजा विक्री प्रकरणी एकजण गजाआड ; १२ किलो गांजा जप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

लोहगाव परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन लाख रुपयांचा १२ किलो गांजा जप्त करण्यात आला. अखिलेश गरीब मंडल (वय ३४, रा. लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहगावमधील कर्मभूमीनगर परिसरात एकजण थांबला असून त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना मिळाली. त्यानंतर तपात पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडील कापडी पिशवीत सुमारे १२ किलो गांजा सापडला, जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत तीन लाख रुपये आहे. मंडल हा बांधकाम मजूर आहे. त्याने गांजा कोठून आणला, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करीत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!